म. टा. प्रतिनिधी, जळगाव: पगार थकल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली. ही घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. मनोज अनिल चौधरी (वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. एसटी संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती’, असे नमूद केले आहे.

दिवाळी सणापूर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन, ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी, या मागण्यांसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. करोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. एकीकडे राज्यभर आंदोलन सुरू असताना जळगावात एसटी कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मनोज चौधरी हे राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. मनोज चौधरी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसटी कामगार संघटनांचे पदाधिकारी देखील जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here