उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केजरीवाल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. वाल्मिकी मंदिर ते पटेल चौक असा रोड शो काढून मतदारांचं अभिवादन स्वीकारत ते चालले होते. रोड शो दरम्यान त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केजरीवाल ठिकठिकाणी लोकांना संबोधित करत होते. भेटत होते. समर्थकांच्या गर्दीतून वाट काढताना त्यांना बराच उशीर झाला. निवडणूक कार्यालयात आपण वेळेत पोहोचू शकणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत: तसं जाहीर केलं.
वाचा:
‘मोठ्या संख्येनं पाठीराखे व लोक मला भेटायला येत होते. त्यांना डावलून पुढं जाऊ शकत नव्हतो. त्यामुळं उद्या अर्ज दाखल करण्याचं ठरवलं आहे,’ असं त्यांनी सांगितलं. विधानसभेच्या ७० मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times