असं या अजोबांचं नाव असून ते पत्रकार व समाजसेवक आहेत. तरुणपणी साखरपुडा मोडल्यानंतर त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याची शपथ घेतली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्यांना एकांत सहन होईना आणि तेव्हाच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पाटील यांनी ६६ व्या वर्षी ४५ वर्षीय संजनासोबत लग्नगाठ बांधली. संजना आणि तिच्या पतीचा चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. ती तिच्या भावासोबत राहत होती. मात्र, करोनाच्या महामारीत तिच्या भावाचा मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली आणि तेव्हाच तिनं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तीन महिन्यांच्या ओळखीनंतर लग्नाचा निर्णय
ऑगस्टमध्ये माधव पाटील व संजना यांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास तीन महिने ते एकमेंकाच्या संपर्कात होते. एकमेकांचा स्वभाव, आवडी- निवडी जाणून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २९ ऑक्टोबर रोजी दोघंही लग्नबंधनात अडकले. माधव व संजना यांच्या लग्नात दोघांच्याही जवळचे नातलग व काही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
‘१९८४साली माझा साखरपुडा मोडला तेव्हा मी पुन्हा लग्न न करण्याची शपथ घेतली होती. मी माझा निर्णय बदलावा यासाठी माझे नातलग, मित्रांनी तेव्हा माझ्यावर दबावदेखील टाकला. पण, तेव्हा माझा लग्न या व्यवस्थेवरील विश्वास उडाला होता. मी मी गावातील समाजसेवेत माझं मन रमवलं त्यातच मी नेहमी व्यग्र असायचो. पण, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मी घरात बंदिस्त झालो तेव्हा मला एकटेपणाची जाणीव झाली आणि साथीदाराची गरज आहे, असं वाटू लागलं,’ अशा शब्दांत माधव पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर माधव पाटील यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पाटील यांच्या वयावरून टिंगल केली आहे. तर, काहींनी प्रेमात पडण्याचं कोणतही वय नसतं, असं म्हणत माधव पाटील यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times