मुंबईः माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांच्यावर टीका करताना ब्राह्मणां सदर्भात केलेल्या वक्तव्यावर यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. तसंच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

६ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका सभेत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान दिले, असं वक्तव्य केलं होतं. खडसेंच्या याच वक्तव्यावर ब्राह्मण महासभेनं आक्षेप नोंदवला होता. तसंच, एकनाथ खडसेंनी माफी मागून वक्तव्य मागे न घेतल्यास पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यानंतर खडसेंनी ट्विट करत माफी मागितली आहे.

‘६ नोव्हेंबर रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला, ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळं ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहोचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं खडसेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते खडसे

जळगावातील एका सभेत बोलतान खडसेंनी फडणवीसांच्या जातीचा उल्लेख करुन त्यांच्यावर टीका केली. ‘नाथाभाऊ दिलदार आहेत. मी भल्याभल्यांना दान देतो, मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. म्हणून मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान दिलं,’ असं ते म्हणाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here