अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यापासून भाजपचे नेते सातत्यानं सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. मुंबईतील आमदार राम कदम हे अर्णव प्रकरणात पहिल्या दिवसापासून जोरदार आवाज उठवत आहेत. अर्णवच्या अटकेचा निषेध म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर वांद्रे ते सिद्धिविनायक मंदिर पायी चालत जाऊन अर्णव यांच्या सुटकेसाठी सिद्धिविनायकाला साकडे घातले. आज ते तळोजा कारागृहात अर्णव गोस्वामींची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.
वाचा:
राम कदम यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘अर्णव यांच्या जिवाला धोका आहे,’ असा आरोप कदम यांनी केला आहे. ‘अर्णव यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही. त्यांनी बळजबरीनं राज्यावर आणीबाणी लादली आहे,’ असंही कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘अर्णव यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, महाराष्ट्र सरकार बरखास्त करा,’ अशी मागणीही कदम यांनी केली आहे.
कोठडीत असताना मोबाइल फोनचा वापरल्यामुळं अर्णव यांना तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं आहे. त्यांच्याकडे कोठडीत असताना मोबाइल फोन आला कुठून, कोणी दिला? याची चौकशी आता करण्यात येत आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times