कलम ३७० हटवल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजप प्रणित एनडीए सरकारच्या आदेशावरून फारूक अब्दुल्ला यांच्यासह राज्यातील सर्व बड्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होते. अलिकडेच फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीचे प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना सोडण्यात आलं. यानंतर, कलम ३७० लागू करण्यासाठी गुपकार डिक्लेरेशननुसार राज्यातील सर्व पक्ष एक झाले आहेत.
‘भाजपवर निशाणा साधत आहे’
“आमची गँग नाहीए. तर आमच्या पक्षांची एक राजकीय आघाडी आहे. जे लोक आम्हाला गँग म्हणत आहेत ते सर्वात मोठे दरोडेखोर आहेत. म्हणूनच ते सर्वांना गँगच्या नजरेने पाहत आहेत. आम्ही आघाडीतील पक्ष (जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणूक) ही एकत्र निवडणूक लढवू. पण आमच्या आघाडीला निवडणूक चिन्ह मिळू शकत नाही. म्हणूनच आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर संयुक्त उमेदवार उभे करून निवडणूक लढवू, असं अब्दुल्ला म्हणाले.
‘महात्मा गांधींच्या भारतावर विश्वास’
भाजपवर हल्ला चढवताना अब्दुल्ला म्हणाले, ‘आम्ही देशाचे शत्रू नाही. आम्ही भाजपचे शत्रू आहोत. त्यांना हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्यात फूट पाडायची आहे. महात्मा गांधींच्या भारतावर आमचा विश्वास आहे. या भारतात सर्व समान आहेत, असं फारूक अब्दुल्ला म्हणाले. अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशनचे प्रमुख आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times