मुंबई: राज्यात आज ३ हजार २७७ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत २० रुग्ण दगावले आहेत. तांत्रिक कारणाने बंद असल्याने अन्य तपशील आज उपलब्ध नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ( Latest Updates )

वाचा:

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून गेल्या २४ तासांत ३ हजार २७७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज पोर्टल बंद असल्याने वगळता इतर जिल्हे आणि महापालिकांकडून मिळणारी दैनंदिन मृत्यूंची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. आज राज्यात २० मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि हे मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झालेले आहेत. त्याबाबत पालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. राज्यात आधी झालेल्या व नोंद न झालेल्या एकूण ६५ मृत्यूंची आज भर पडली असल्याचेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.६३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ८२ हजार ९४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २३ हजार १३५ (१८.१७ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र शासनाच्या कोविड पोर्टल नुसार राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची दैनंदिन माहिती अद्ययावत करण्यात येते तथापि आज कोविड पोर्टल तांत्रिक कारणाने बंद असल्याने दैनंदिन बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही, असे आरोग्यमंत्री यांनी नमूद केले.

वाचा:

मुंबईचे आकडे दिलासा देणारे

मुंबईसाठी दिवाळीच्या तोंडावर शुभसंकेत मिळत आहेत. मुंबईतील दैनंदिन करोना बाधित रुग्णांचा आकडा आज खूप खाली आला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५९९ नवीन बाधितांची नोंद झाली तर ५०७ रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबई पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांत सध्या १६ हजार ९२३ रुग्णांवर उपचार आहेत. आतापर्यंत एकूण २ लाख ६५ हजार १४२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ लाख ३७ हजार २९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर १० हजार ४६२ जणांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईतील करोना रिकव्हरी रेट ९० टक्के इतका असून रुग्ण दुपटीचा कालावधी २२९ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here