वाचा:
पंधरा दिवसापूर्वी बेळगाव येथील मिलिटरी एरियात लष्करी पोशाखात फिरताना मंजुनाथ बिराजदार तेथील काही अधिकाऱ्यांना दिसला. त्यांना संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्यास कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. त्याने अनेक महिलांना भुरळ घालत पाच लग्ने केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
वाचा:
मंजुनाथ याचे वय ३७ वर्षे असून तो कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड या गावातील आहे. मी अनाथ आहे, असे म्हणत तो एखाद्या गावात जात असे. मी लष्करात असल्याचे सांगून लग्नासाठी मुलगी पाहत असल्याचे सांगत असे. लष्करी पोशाख आणि बनावट ओळखपत्र असल्याने गावातील व्यक्तींवर त्याचा प्रभाव पडायचा. यातून त्याने विजापूर, इंडी, सुरतकल, रायचूर जिल्ह्यातील मस्की व लिंगसूर येथील पाच तरुणींशी विवाह केला. विवाहानंतर त्यांच्याच घरी राहून तो पाहुणचार घ्यायचा आणि नंतर गायब व्हायचा. गेले दोन तीन वर्षे त्याची ही फसवेगिरी सुरू होती.
वाचा:
मंजुनाथने अनेक वीरपत्नींना गाठले. मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळले. काही तरुणांना नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडूनही त्याने पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर या बनावट अधिकाऱ्याने अनेकांना गंडा घातल्याचे लक्षात आले असून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times