सर्वात आधी मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. सकाळी ८.१५ वाजेपासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. ईव्हीएममधील एका फेरीच्या मतांची मोजणी करण्यासाठी १५ ते २० मिनिटं लागतील. तर पहिला कल सकाळी साडेआठ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. सुमारे ६०० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. करोना व्हायरसमुळे मतमोजणी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल. मतपत्रिका आणि ईव्हीएममधील मतांची वेळेत मोजणीत सुरू होणाऱ्यासाठी मतमोजणी करणाऱ्या कर्मचार्यांना सकाळी ६ वाजेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
फतुहा आणि बख्तियारपूरचा निकाल आधी
पाटण्यातील १४ विधानसभा मतदारसंघांपैकी फतुहा आणि बख्तियारपूर या दोन विधानसभा मतदारसंघाचे निकाल आधी लागतील. कारण इतर विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत या दोन विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची संख्या कमी आहे. फतुहा विधानसभा मध्ये ४०५ आणि बख्तियारपूर विधानसभेत ४१० मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघांचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. दिघा, कुंम्हरार आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघांचे निकाल उशिरा लागलीत. दिघाच्या मतमोजणीला बराच वेळ लागले. पाटणा जिल्ह्यातील सर्व १४ विधानसभा मतदारसंघांसाठी ए. एन. कॉलेजमध्ये मतमोजणी केंद्र बनवण्यात आलं आहे. प्रत्येक विधानसभेची मतमोजणी दोन मंडपात होईल. त्याचबरोबर पाटणा साहिब विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची व्यवस्था ४ ठिकाणी करण्यात आली आहे.
बहुतेक एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला अधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी नितीशकुमार यांच्या एनडीएला महाआघाडीच्या तुलनेत कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे बिहारची निवडणूक कोण जिंकरणार याची उत्सुकता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times