अलिबाग: अलिबाग येथील प्रसिद्ध वास्तुविशारद व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांची कारागृहात दररोज तीन तास पोलीस चौकशी केली जाणार आहे. ( allows to question in )

वाचा:

अर्णब गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अलिबाग येथून तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब यांची तळोजा कारागृहात विशिष्ठ वेळेत चौकशी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती रायगड पोलिसांकडून अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात करण्यात आली होती. या विनंतीवर आज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे. न्यायालयाने तळोजा कारागृहात अर्णब यांच्या पोलीस चौकशीसाठी परवानगी दिली आहे. तळोजा कारागृहात जाऊन दररोज तीन तास अर्णब यांची चौकशी करू शकतात, असे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे. याआधी ६ नोव्हेंबर रोजी अलिबाग कोर्टानेच दिलेल्या आदेशात अलिबाग येथे कोठडीत अर्णब यांची पोलीस चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली होती.

वाचा:

दरम्यान, अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अर्णब गोस्वामी आणि अन्य दोघांना ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या कोठडीला अर्णब व अन्य दोन आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हायकोर्टाने तिघांचेही जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावले आहेत. त्याचवेळी अर्णब व दोन आरोपींचा तपास कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर ठरत नसल्याचेही हायकोर्टाने नमूद केले आहे. त्यामुळे अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येच्या तपासाला आता गती मिळणार आहे. तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी कोर्टात विनंती अर्ज केला आहे तर दुसरीकडे अर्णब व अन्य आरोपींनी जामिनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर चार दिवसांत निर्णय द्यावा असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस वेगवान घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here