निवडणुकीत प्रत्येक जागेचं महत्त्व लक्षात घेऊन भाजप आणि कॉंग्रेस दोघेही मोठे दावे करत आहेत. पण दोन्ही पक्षांचे मोठे नेते सक्रीय आहेत. कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यास ठीक आहे, अन्यथा आमदारांचा घोडेबाजार पुन्हा सुरू होऊ शकतो. हे लक्षात घेता भाजपचे संकट मोचक सहकार मंत्री अरविंद भदौरिया यांनी कॉंग्रेसच्या तीन आमदारांची भेट घेतली. नगर विकास मंत्री भूपेंद्र सिंह यांनी बसपा आमदार रामबाई यांची भेट घेतली. ७ बिगर कॉंग्रेस आणि बिगर भाजप आमदारांनी बाजू बदलू नये, हा या मागचा प्रयत्न आहे. तर कॉंग्रेसनेही या सात जणांची मनधरणी करण्यास सुरवात केलीय.
भाजपने सर्वा जांगावर प्रभारींना सतर्क केलं आहे. कोणतीही नाराजी निर्माण होऊ नये, यासाठी संघटनाही लक्ष ठेवून आहेत. कॉंग्रेसनेही सावध होत आपल्या आमदारांना भोपाळमध्ये बोलावलं आहे. निकालानंतर गरज भासल्यास कॉंग्रेसचे आमदार ज्या राज्यात कॉंग्रेसचं सरकार आहे अशा शेजारील राज्यात त्यांना पुन्हा एकदा पाठवलं जाऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणे आहे. एक मोठा प्रश्न म्हणजे या निवडणुकीत १४ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी ११ जणांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या सूचनेवरून त्यांनी पक्ष बदलला आहे. यामुळे त्यांची प्रतिष्ठाही धोक्यात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times