चिदानंद राजघाटा, वॉशिंग्टनः राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अमेरिकेत आता सत्ता हस्तांतराच्या मुद्द्यावरून वाद रंगला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ( ) सरकारच्या चाव्या निवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( ) यांच्या हस्तांतरणाच्या टीमकडे (ट्रम्प अध्यक्ष असेपर्यंत म्हणजे जानेवारी २०२१ पर्यंत मुख्य धोरणांवर काम करणारी टीम) देण्यास नकार दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सतत त्यांच्यावर निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप करत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या या भूमिकेवरून त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील मतभेद आणखी तीव्र होत आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यास जिंकणारा उमेदवार एक हंस्तातर करणारी (ट्रांझिशन टीम) बनवतो. त्या टीमला सरकारच्या प्रत्येक इमारतीत आणि प्रत्येक कार्यालयात जागा दिली जाते, जिथून ते पुढील सरकार चालवण्यासाठी आवश्यक तयारी करतील. यासाठी बजेटही जााहीर करण्यात आला आहे. हा बजेट यावेळी जवळपास १० दशलक्ष डॉलर्स इतका असेल. बायडन यांची टीम सोमवारी प्रशासनाच्या प्रमुखांकडून पोहोचली. पण यावेळी हस्तांतराच्या पत्रावर सही करण्यास ट्रम्प प्रशासनाने नकार दिला.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांचा विजय स्वीकारलेला नाही. म्हणूनच जनरल सर्व्हिसेस अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख एमिली मर्फी यांनी व्हाइट हाऊसच्या परवानगी शिवाय हस्तांतराच्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यांची नियुक्ती ट्रम्प यांनी केली होती.

जो बायडन यांची हस्तांतर करणारी टीम आतापासूनच कामाला लागली आहे. करोना व्हायरसच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी भारतीय वंशाच्या विवेक मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स देखील तयार केला गेला आहे. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत निवडणुकीच्या निकालांवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि बायडन-हॅरीसला यांचा विजयावरून माध्यमांवर टीका करत आहेत.

ट्रम्प यांनी बायडेन यांचा विजय स्वीकारला नसला तरी त्यांच्याच च्या रिपब्लिकन पक्षाचे काही जुने नेते डेमोक्रॅट उमेदवाराचा विजय मान्य करत असून ट्रम्पांना अप्रत्यक्षरित्या हा विजय स्वीकारण्याची सूचना करत आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी एक निवेदन जारी केलं आहे. ‘नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी बोललो. विजयाबद्दल अभिनंदन केलं आणि देशाला उद्देशून केलेल्या संदेशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांचे आभार मानले. आमच्यात राजकीय मतभेद असले तरीही एक चांगली व्यक्ती म्हणून जो बायडन यांना ओळखतो. देशाला एकजूट करण्याची आणि पुढे नेण्याची मिळाली आहे, असं जॉर्ज बुश म्हणाले.

अमेरिकेचे हयात असलेले ४ माजी राष्ट्राध्यक्ष- जॉर्ज बुश, जिमी कार्टर, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांनी बायडन यांचा विजय मान्य केला आहे. बुश वगळता इतर ३ माजी राष्ट्राध्यक्ष हे बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत.

निवडणुकीच्या निकालावर ट्रम्प कुटुंब विभागलं गेलं आहे. ट्रम्प यांचे जावई जारेड कुशनर यांनी त्यांना पराभव स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे, असं काही वृत्तांतू म्हटलं आहे. फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाची स्वाकारण्याची विनंती केली आहे. पण त्यांनी नंतर ट्विट करून ट्रम्प यांना साथ दिलीय. फक्त योग्य मतांची मोजणी झाली पाहिजे, अवैध मतांची नको, असं त्या म्हणाल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here