जम्मूः जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि राजौरी जिल्ह्यात राष्ट्रीय रायफल्सच्या एका मेजरचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला आहे. मेजर यांच्या मृत्युला राजौरी जिल्ह्याचे एसएसपी चंदन कोहली यांनी दुजोरा दिलाय. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. हे प्रकरण आत्महत्येचं असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मेजर विनीत गुलिया हे ३८ राष्ट्रीय रायफल्ससोबत कंपनी कमांडर म्हणून तैनात होते. त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. सोमवारी सकाळी मेजर गुलिया आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. यानंतर जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

घटनास्थळी मिळाले शस्त्र, तपास सुरू

तपासादरम्यान मेजर यांचे एक शस्रही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मेजर गुलिया यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागीचे कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here