Bihar Election Results 2020: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागत असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आज ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पाहुयात निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स…
Live अपडेट्स…
>> लोकांना निकाल पाहता यावेत यासाठी कंट्रोल यूनिटच्या माध्यमातून प्रदर्शित होणारे निकाल मोठ्या पडद्यावर पाहता यावेत यासाठी निवडणूक आयोगाने कालच निर्देश दिले होते
>> मतमोजणी केंद्र राज्यातील जिल्हा मुख्यालयांमध्ये बनवण्यात आले आहेत.
>> मतमोजणी पारदर्शक व्हावी यासाठई मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
>> थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात
>> आज बिहार विधानसभा निवडणूक निकालाचा दिवस. अनेक दिग्गजांसह आज होणार ३ हजार ७३४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times