टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. रिपब्लिकसंबंधित ही पहिलीच अटक आहे. त्यामुळे आता रिपब्लिकच्या अडचणींत भर पडली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. या प्रकरणात थेट सहभाग दिसून आल्याने रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे सांगितले जात आहे.
टीआरपी घोटाळ्यात यापूर्वी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज, सकाळी थेट रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पहिलीच अटक झाली आहे. त्यामुळे आता अटक केलेल्या आरोपींची संख्या आता १२ झाली आहे. आधी अटक करण्यात आलेल्या कोळावडे याने रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी लाखो रुपये दिल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली होती. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक याच्या घराची आणि आशिष चौधरी याच्या पोखरण येथील ऑफिसमध्ये झाडाझडती घेतली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times