अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत बायडन यांनी यांचा पराभव करून विजय मिळवला. बायडन २००९ ते २०१७ या कालावधीत अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या दरम्यान २०१३मध्ये ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून मुंबईत नियुक्तीस असणारे कृष्णप्रकाश यांच्यावर होती. त्या वेळी काढलेला फोटो कृष्णप्रकाश यांनी सोशल मीडियावर शेअर करून, बायडन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
बायडन यांच्या भेटीबद्दल कृष्णप्रकाश म्हणाले, ‘जो बायडन अमेरिकचे उपाध्यक्ष असताना २०१३मध्ये मुंबईत आले होते. त्या वेळी मी दक्षिण मुंबई विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होतो. बायडन यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. बायडन यांच्या दौऱ्यात मुंबई पोलिसांनी उत्तम सुरक्षा पुरवली. त्यानंतर बायडन यांनी मला बोलावून सर्व पोलिसांचे आभार मानले, तसेच हस्तांदोलन करून कौतुकाची थाप दिली होती.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times