मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडी व भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जोरदार चुरस आहे. दोन्ही आघाड्यांना सत्तास्थापनेची समान संधी दिसत असताना शिवसेनेचे खासदार यांनी निकालाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिहारमध्ये जंगलराज जाऊन यांच्या नेतृत्वाखाली मंगलराज सुरू होईल,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

बिहारचे निकाल अद्याप जाहीर झाले नसले तरी सुरुवातीच्या टप्प्यातील मतमोजणीतून पुढचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजप-जेडीयू आणि राजद-काँग्रेसच्या आघाडीत अटीतटीची लढत होत असल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी मात्र तेजस्वी यादव यांच्या बाजूनं कौल दिला आहे. ‘अवघ्या ३१ वर्षांच्या एका तरुणानं केंद्रातील सत्तेला आणि भल्याभल्या नेत्यांना आव्हान दिलंय. ज्या पद्धतीनं हा तरुण बलाढ्य पक्षांशी टक्कर देतोय, ते आश्वासक आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होण्यास हरकत नाही,’ असं राऊत यांनी म्हटलंय. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.

वाचा:

‘बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांनी ‘जंगलराज’च्या विरोधात प्रचार केला. मात्र, गेली १५ वर्षे बिहारमध्ये कोण सत्तेत होतं? कोणाचं जंगलराज सुरू होतं? हा प्रश्न तिथल्या लोकांना पडला होता. त्यामुळं संपूर्ण निकाल हातात येतील, त्यावेळी लोक जंगलराज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेलं असेल,’ असा टोलाही राऊत यांनी हाणला.

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर एक शेर ट्वीट करत भाजपला सूचक टोला हाणला आहे. ‘बादशाह तो वक्त होता है… इन्सान तो यूंही गुरूर करता है। असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here