वाचा :
‘आम्हाला तेजस्वी यादव यांनी नाही तर नैसर्गिक संकटांनी हरवलंय’ असं त्यागी यांनी एका चॅनलशी बोलताना म्हटलंय.
‘नितीश कुमार हा ब्रॅन्ड गायब झालेला नाही किंवा तेजस्वी यादवही स्थापित झालेले नाहीत’, असंही त्यागी यांनी स्पष्ट करताना म्हटलं.
‘आम्ही लोकांच्या निर्णय स्वागत करतो. आम्ही आरजेडी किंवा तेजस्वी यादव यांच्यामुळे पराभूत झालेलो नाहीत तर राष्ट्रीय संकटापुढे हरलोत. कोविड १९ च्या कारणामुळेच आम्ही पिछाडीवर गेलो. बिहारच्या गेल्या ७० वर्षांच्या काळातील दुर्दैवी परिस्थितीचा फटका आम्हाला बसतोय’, असं म्हणत त्यागी यांनी करोना संकटावर आपल्या पराभवाचं खापर फोडलं.
बिहारमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, एनडीए आणि महाआघाडीत जागांसाठी तगडी लढाई दिसून येतेय. सुरुवातीच्या कलानुसार एनडीएपेक्षा महाआघाडीला जागा जास्त दिसत होत्या. मात्र, आता अचानक एनडीएनं मुसंडी मारत १३१ जागांवर आघाडी मिळवलीय. तर महाआघाडी १०० जागांवर पुढे आहे.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times