नाशिक: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पुन्हा सत्ता स्थापन करेल, असं चित्र आहे. असं असलं तरी अननुभवी व नवख्या तेजस्वी यादव यांनी बलाढ्य व संयुक्त जनता दलाला दिलेली कडव्या लढत कौतुकाचा विषय ठरली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री यांनी तेजस्वी यांचं कौतुक केलं आहे. ‘मोदींचा करिष्मा आता राहिलेला नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे.

वाचा:

नाशिकमध्ये ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर त्यांनी जोरदार टीका केली. ‘ज्या पक्षाचा आधार घ्यायचा, त्यांनाच कालांतरानं संपवायचं ही भाजपची नेहमीची रणनीती आहे. महाराष्ट्रात भाजपनं शिवसेनेला सोबत घेतलं. अवघ्या एक ते दोन जागा मिळणाऱ्या भाजपनं शिवसेनेच्या आधारानं पक्ष वाढवला. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचा फटका नितीश कुमार यांना आज बसला आहे,’ असं भुजबळ म्हणाले.

वाचा:

‘बिहारची निवडणूक अटीतटीची झाली. भाजपची पहिल्यासारखी लाट राहिली नाही हेच यातून दिसलं. मोदींचा करिष्माही राहिला नाही,’ असं भुजबळ म्हणाले. तेजस्वी यादव यांनी केलेल्या संघर्षाचं त्यांनी कौतुक केलं. वडील तुरुंगात असताना तेजस्वी यांनी अत्यंत कुशलपणे पक्षाचं नेतृत्व केलं. त्यांचं सरकार येवो किंवा न येवो, पण त्यांचं अभिनंदन करायला हवं,’ असंही भुजबळ म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here