स्वत: नीतीश कुमार यांनी पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसून ती काहिशी खराब असल्याचे मान्य केले आहे. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्या आमदारांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, अजूनही ब्रँड नीतीश धुसर झालेला नाही, असे नीतीश कुमारांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मात्र यावेळी अँटी इन्कम्बन्सीचा फटका नीतीश कुमार यांन बसू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
‘कोविड आणि चिराग पासवान जबाबदार’
चिराग पासवान आणि कोविडमुळेच जनता दल युनायटेडची कामगिरी खराब होत असल्याचे नीतीश कुमार यांच्या टीमने म्हटले आहे. ३८ वर्षीय चिराग आपल्या संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान नीतीश कुमार यांना निशाणा बनवले होते. चिराग पासवानांचा लोक जनशक्ती पक्ष हा केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीलाच चिराग पासवान यांना वेगळे करायला हवे होते, असे जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी म्हटले आहे. पासवान यांच्यावर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवायला हवे होते, असेही ते म्हणाले. चिराग पासवान यांनी नीतीश कुमार यांच्या वोटबँकेला खिंडार पाडल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
क्लिक करा आणि वाचा-
चिराग पासवान यांना बंडखोरी करण्यास भारतीय जनता पक्षानेच सांगितले असल्याचा भाजपचे टीकाकार आणि नीतीश कुमार, तसेच त्याच्या सहकाऱ्यांचा अंदाज होता. बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार यांचे महत्व कमी करणे हा यामागील उद्देश होता. यामुळे जुन्या सहकाऱ्याच्या भविष्याचा फैसला भारतीय जनता पक्षाच्या हातात येईल अशी स्थिती दिसत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times