मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप पूर्ण झाली नसली तरी सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. त्यानुसार, भाजप-संयुक्त जनता दलाची आघाडी बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या निकालामुळं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून भाजपचे नेते विरोधकांना लक्ष्य करू लागले आहेत. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या निमित्तानं काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

वाचा:

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं काँग्रेसशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय जनता दलानं या निवडणुकीत चांगली कामगिरी केली असली तरी काँग्रेसला फार मजल मारता आलेली नाही. त्याचा परिणाम अंतिम निकालावर होणार आहे. हीच संधी साधून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी काँग्रेसचे नेते यांच्यावर टीका केली आहे.

वाचा:

‘राहुल गांधी यांनी ज्याच्या सोबत हात मिळवले ते बुडाले,’ अशी बोचरी टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. उत्तर प्रदेशात त्यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडी केली. तिथं समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी काँग्रेसला जवळ केले. त्यामुळं डाव्यांना ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून सपाटून मार खावा लागला. आता हे काँग्रेससोबत गेले आणि पराभूत झाले,’ असं उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here