सोशल मीडियावर हिनं केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला १० नोव्हेंबर आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.
वाचाः
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी कंगना व रंगोलीला दुसरी नोटिस पाठवली होती. पण कंगनानं या नोटिशीला उत्तर देत भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्यानं पोलिसांसमोर हजर राहू शकणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र, त्यालाही नकार देत त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत हजर राहू शकतो असं उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता कंगना व रंगोली १५ नोव्हेंबरला तरी पोलीस ठाण्यात हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times