‘तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळं उपचारासाठी आज लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईन,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांना जून महिन्यात करोनाचाही संसर्ग झाला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साधारण दहा ते बारा दिवसांच्या उपचारांनंतर त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर नियमानुसार १४ दिवस होम क्वारंटाइन राहून ते पुन्हा एकदा कामाला लागले होते.
वाचा:
करोनाने आजारी असतानाच्या काळात पंकजा मुंडे यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्याची बरीच चर्चा झाली होती. अलीकडेच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर संयुक्त बैठकही घेतली होती.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times