बिहारमध्ये तीन टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासूनच सुरु आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेनंही जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण या निवडणूकीत शिवसेनेला नोटापेक्षा कमी मते मिळाली आहे. यावरुनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिहारमध्ये सोनिया सेनेला नोटापेक्षा कमी मते मिळाली. निवडणूक चिन्ह म्हणून बिस्किटच बरे होते विनाकारण तुतारीची लाज काढली,’ असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
बिहार निवडणुकीत शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहेत तर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालं आहे. विशेष म्हणजे नोटाला १. ७४ टक्के मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०. २३ टक्के मते मिळाली आहेत. दुपारी तीन पर्यंत झालेल्या मतमोजणीत ही आकडेवारी समोर आली आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने बिस्किट चिन्ह दिले आहे. पण, शिवसेनेने या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्यानं दुसरं चिन्ह देण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह शिवसेनेला दिलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times