मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजेंच्या पॅलेसमधून आरोपीने चांदीची बंदूक चोरली होती. येथील एका सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडे ती बंदूक विक्रीसाठी तो घेऊन जाणार होता. याबाबतची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गुसिंगे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन फूट लांब, दीड किलो वजनाची चांदीची बंदूक सापडली. तिची किंमत अंदाजे १ लाख चार हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
दीपक सुतार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ही बंदूक उदयनराजे यांच्या पॅलेसमधून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आणखी बातम्या वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times