नवी दिल्ली : सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पाऊलं उचलली. सरकारच्या या प्रयत्नांना वाहन निर्माता कंपन्याही चांगली साथ देत आहेत. महिंद्रा, टाटा मोटर्स आणि ह्युंदाईनंतर आता एमजी मोटर्सनेही आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याची तयारी केली आहे. भारतीय बाजारात गेल्या वर्षात एप्रिल ते डिसेंबरमध्ये टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक टिगोर ही सर्वात जास्त विक्री झालेली ईव्ही ठरली.

एप्रिल ते डिसेंबर २०१९ या काळात एकूण १५५४ इलेक्ट्रिक कारची विक्री झाली. यापैकी एकट्या टिगोरचे ६६९ युनिट्स विकले गेले. भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या गेलेल्या ईलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर महिंद्रा e-Verito आहे. एप्रिल-डिसेंबर २०१९ या काळात ५६३ महिंद्रा e-Verito ची विक्री झाली. तर ह्युंदाई कोना (२९२ युनिट्स) तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिंद्रा e20 चे ३० युनिट्स विकले गेले.

टिगोर सुरुवातीला सरकारी वापरासाठी लाँच करण्यात आली होती. पण गेल्या वर्षीपासून ही कार वैयक्तिक वापरासाठीही लाँच करण्यात आली. इलेक्ट्रिक टिगोरची रेंज २१३ किमी आहे. ही रेंज ARAI कडून प्रमाणित करण्यात आली.

इलेक्ट्रिक XE+, XM+ आणि XT+ या तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली होती. सरकारी णि खाजगी दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी ही कार उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक टाटा टिगोर सध्या ३० शहरांमध्ये उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक टाटा टिगोरमध्ये २१.५kWh बॅटरी पॅक आहे. डीसी KW फास्ट चार्जरवर ही कार ९० मिनिटात ८० टक्के चार्ज होते. तर एसी चार्जरवर ८० टक्क्यांसाठी सहा तास लागतात.

टाटा इलेक्ट्रिक टिगोरमध्ये ड्युअल एअरबॅग्स (XE+ मध्ये फक्त चालकासाठी एअर बॅग आहे), अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम स्टँडर्ड सेफ्टी फीचरसह देण्यात आलं आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक कार सध्या वेगवेगळ्या रेंजमध्ये येत आहेत. एमजी मोटर्सची SUV ZS या महिन्याच्या शेवटी लाँच होणार आहे. या कारसाठी २१०० बुकिंग अगोदरच मिळाल्या असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here