मुंबईः बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे काही कल हाती आले आहेत. यात एनडीएला मोठं यश मिळताना दिसत आहे. तर, भाजपनंही जोरदार मुसंडी मारली असून सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. भाजपचे नेत्यांनी या यशाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

बिहार विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर भाजपनं निवडणूक प्रचाराची धुरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये प्रत्यक्षात जाऊन रॅली, प्रचार केला होता. जे.पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला चांगले यश मिळवून दिल्याची भावना भाजपच्या गटातून व्यक्त होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही बिहारमधील भाजपच्या यशाचं श्रेय फडणवीसांना दिलं आहे.

नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. बिहार देवेंद्र फडणवीस यांनी आणेल आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीस पाहिजेत, असं ट्विट केलं आहे. त्याचबरोबर, पुन्हा येणारच…. येणारच! असा विश्वासही व्यक्त केला आहे.

नितेश राणे यांनी आणखी एक ट्विट केलं आहेत. संपूर्ण देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भारताला जर पुढं जायचं आहे तर भाजपशिवाय पर्याय नाही हे स्पष्टच आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here