पाटणा : ची उत्सुकता आता ताणली गेलीय. सद्य घडीला (रात्री ९.०० वाजता) एनडीएला १२२ जागांवर तर महाआघाडीला ११४ जागांवर आघाडी मिळालेली दिसतेय. इतर किंवा अपक्ष ७ जागांवर आघाडीवर आहेत. अद्याप बहुतेक जागांवरचे अंतिम निकालाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. मात्र, या दरम्यान तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून मतमोजणीत गोंधळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

राष्ट्रीय जनता दलानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या उमेदवारांची एक यादीच प्रसिद्ध केलीय. ‘ही त्या ११९ मतदारसंघांची यादी आहे जिथे मतमोजणी संपूर्ण झाल्यानंतर महाआघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. रिटर्निंग अधिकाऱ्यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या परंतु, आता मात्र ते सर्टिफिकेट न देता पराभूत झाल्याचं उमेदवारांना सांगत आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही त्यांना विजयी घेषित करण्यात आलं. लोकशाही अशी लुटालूट चालणार नाही’ असं आरजेडीनं या ट्विटमध्ये म्हटलंय.

वाचा : वाचा :

११९ जागांवर जिंकल्यानंतरही टीव्ही चॅनलवर १०९ हा आकडा दर्शवण्यात येतोय. नितीश कुमार अधिकाऱ्यांना फोन करून हा गोंधळ घडवून आणत आहेत. अंतिम निकाल आल्यानंतर आणि शुभेच्छा दिल्यानंतर आता अधिकारी अचानक सांगत आहेत की तुम्ही पराभूत झाला आहात, असा गंभीर आरोप आरजेडीकडून करण्यात आलाय.

मतमोजणीस का होतोय विलंब

कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीत बदल करून मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी काही तासांचा उशीर लागत असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. यंदा बिहार मतदानासाठी एकूण १ लाख ६ हजार ५२६ मतदान केंद्र उभारण्यात आली होती. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या ६३ टक्क्यांनी अधिक आहे. २०१५ च्या निवडणुकीत केवळ ६५ हजार ३६७ मतदान केंद्र होती. यंदा मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आल्यानं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे हा उशीर होत आहे.

तसंच, नियमानुसार एखाद्या उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतला तर अशा स्थितीत ईव्हीएम सील करून त्यातील मतांच्या संख्येची ‘व्हीव्हीपॅट’सोबत पडताळणी करुन पाहण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी ८.०० वाजता सुरू झालेली ही मतमोजणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here