नवी दिल्लीः बिहारमध्ये एनडीएने ( भाजप-जेडीयू ) बहुमताचा ( ) आकाडा गाठला आहे, असा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केला आहे. तर एनडीएने पूर्ण बहुमत मिळवले आहे. आरजेडी आणि एनडीएमध्ये जागांची मोठी तफावत आहे. आता त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे जिंकलो तर ठीक नाही जिंकलो तर मतमोजणीत घोळाचा आरोप करायचा हा त्या त्यांचा अजेंडा आहे, असं प्रत्युत्तर भाजपच्या संजय जयस्वाल यांनी आरजेडीच्या आरोपांवर दिलंय.

दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतमोजणी आणि निकाली माहिती दिली आहे. बिहार निवडणुकीत आतापर्यंत १६५ जागांचे निकाल लागले आहेत. यात एनडीएचा ८३ जागांवर विजय झाला आहे. तर महाआघाडीने ७६ जागा जिंकल्या आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एनडीएने जिंकलेल्या ८३ जागांमध्ये भाजप-४७, जेडीयू -२९, व्हीआयपी-४, एचएएम- ३ समावेश आहे. तर आणखी ३९ जागांवर आघाडीवर आहे.

महाआघाडीने ७६ जागा जिंकल्या आहेत. आरजेडी-५२, काँग्रेस- १२ आणि डाव्या पक्षांनी १२ जागांवर विजय मिळवला आहे. तर ३७ जागांवर महाआघाडी आघाडीवर आहे. याशिवाय एमआयएमने ४ जागा जिंकल्या आहेत. १ जागेवर आघाडीवर. बसपा आणि अपक्षाने प्रत्येकी १ जागा जिंकली आहे.

बिहार विधानसभेचे संपूर्ण निकाल रात्री आयोगाकडून दिले जातील. मध्यरात्री उशिरा अखेरची अपडेट दिली जाईल, अशी माहिती आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी दिली. दरम्यान निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू असलेल्या विजयी उमेदवारांची यादी जाहीर केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here