मुंबई: जळगावमधील तालुक्यात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या घटनेवर विरोधी पक्षनेते यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. ( Targets Over )

वाचा:

‘ जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका तरुणीवर बलात्कार आणि नंतर विष देऊन झालेली हत्येची घटना अतिशय गंभीर आहे’, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. पण, कुठेही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही, असा आरोप करत फडणवीस यांनी महिलांच्या सुरक्षेवरून राज्य सरकारला लक्ष्य केले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी. जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून नराधमांना शिक्षा व्हावी. नसत्या गोष्टींत वेळ घालवायचा आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, असे करून चालणार नाही. माझी विनंती आहे, या मुद्द्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असेही फडणवीस यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

नेमकं काय घडलं?

सामूहिक अत्याचाराची शिकार ठरलेली पीडित तरुणी पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील असून ती दिवाळीसाठी ३ नोव्हेंबर रोजी भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता औषधे घेण्यास बाहेर जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही आणि चिंता वाढली. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. शेवटी तिच्या मामाने ८ नोव्हेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असल्याने तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळले. मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केली असता ती त्यांचीच भाची असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना धक्काच बसला. रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरू होते. मात्र, तिची प्रकृती अधिक खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले. धुळ्याला नेले जात असताना ही तरुणी शुद्धीवर आली. यावेळी तिने सोबत असलेल्या नातेवाईकांना आपले अपहरण करून तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याचे सांगितले. एका महिलेच्या मदतीने बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले. पीडित तरुणीने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या टोळी गावातील तीन तरुणांची नावेही सांगितली आहेत. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असतानाच मंगळवारी पहाटे धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन पीडितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here