नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रात्रीच्या सुमारास एकामागून एक ट्विट करत बिहारमधील जनतेचे आभार मानले. बिहारच्या जनतेने विकासाला प्राध्यान्य दिलंय. प्रत्येक मतदाराने आपलं स्वप्न आणि आपेक्षा काय आहेत? हे आपल्या मतदानातून दाखवून दिलं, असं म्हणाले.

बिहारने जगासमोर लोकशाहीचे एक मोठे उदाहरण ठेवले आहे. लोकशाही कशी बळकट केली जाते हे बिहारच्या जनतेने दाखवले आहे. विक्रमी संख्येत बिहारमधील महिला, गरीब आणि वंचितांनी मतदान केलं. विकासाला मत देऊन आपला निर्णय दिला, असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.

बिहारच्या गावे-गरीब, शेतकरी-मजूर, व्यापारी – दुकानदार अशा प्रत्येक वर्गाने एनडीएच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रार विश्वास ठेवला. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन देतो, बिहारच्या संतुलित विकासासाठी झोकून देऊन सातत्याने काम करू, असं मोदी म्हणाले.

अमित शहांचे ट्विट

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here