वाचा:
बिहारमध्ये निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेत जनतेला विकासाच्या बाजूने मतदान करण्याची साद घातली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच प्रमुख केंद्रीय मंत्री बिहारच्या प्रचारात उतरले होते. त्याला यश मिळाले असून बिहारमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येणार हेसुद्धा जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.
वाचा:
बिहार निवडणुकीदरम्यान फडणवीस यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे फडणवीस यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारमध्ये जाता आले नाही. करोनावर मात केल्यानंतर ते सध्या विश्रांती घेत असून बिहारच्या यशावर त्यांनी रात्री उशिरा आपली प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला जंगलराज नको तर विकास हवा आहे, हे बिहारच्या जनतेने आज स्पष्ट केले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असून नितीशकुमार यांच्यावरही विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी बिहारच्या जनतेला मी कोटी कोटी धन्यवाद देतो’, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.
बिहारमध्ये ऐन करोनाकाळात निवडणुका पार पडल्या. लोकशाहीच्या या उत्सवात जनतेने उत्साहाने सहभाग नोंदवला आणि जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो, असे फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे. देशभरात ११ राज्यांमध्येही पोटनिवडणुका पार पडल्या. या राज्यांत भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यासाठी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
वाचा:
दरम्यान, बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यास नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असा शब्द आधीच जदयुने भाजप नेतृत्वाकडून घेतला आहे. आता निकालात भाजप हा मोठा भाऊ ठरल्याने व जदयुपेक्षा भाजपला ३० जागा जास्त असल्याने पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आधी ठरल्यानुसार भाजप नितीश यांना मुख्यमंत्रीपद देणार की या पदावर दावा सांगणार, या प्रश्नाचे उत्तर अद्यापतरी मिळालेले नाही. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये बीजेपी स्वीप्स ( #BJPSweeps ) असा हॅशटॅग वापरल्याने त्यावरूनही तर्क लावले जाऊ लागले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times