शारजा : रोहित शर्माने आजच्या अंतिम सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत दोन विक्रमांनाही गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले. या विक्रमांसह रोहितने आपल्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वांचीच मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी नेमक्या कोणत्या विक्रमांना गवसणी घातली, पाहा…

रोहितने आजच्या सामन्यात ५१ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची दमदार खेळी साकारली आणि मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत सहज जेतेपद मिळवले. या खेळीसह रोहितने यावेळी दोन विक्रमांची नोंद केली आहे. रोहित शर्माने आजच्या सामन्यात आठ धावा केल्या आणि मुंबई इंडियन्स या एका संघाकडून खेळताना त्याच्या चार हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळताना चार हजार धावा या दोन फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहे. विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना ही कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

रोहितने आजच्या सामन्यात जर ४३ धावा करत एक कर्णधार म्हणून खेळताना त्याच्या तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत ही कामगिरी आयपीएलमधील तीन कर्णधारांना करता आलेली आहे. यापूर्वी गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी अशी कामगिरी केलेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे रोहित आजच्या सामन्यात हा मैलाचा दगड गाठणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. रोहित यापूर्वी डेक्कन चार्जर्सच्या संघात होता. पण त्यानंतर मुंबईच्या संघात आल्यावर रोहितने प्रत्येक मोसमात चांगल्या धावा केल्या आहेत. रोहित आजच्या सामन्यात हे दोन विक्रम करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रोहितचा आजचा हा आयपीएलमधील दोनशेवा महत्वाचा सामना होता. दोनशेव्या सामन्यात रोहितने आज ही दमदार खेळी खेळू दाखवली. यापूर्वी फक्त एकाच खेळाडूला आयपीएलमध्ये दोनशेपेक्षा जास्त सामने खेळता आलेले आहे. आतापर्यंत फक्त महेंद्रसिंग धोनीला दोनशेपेक्षा जास्त आयपीएलचे सामने खेळता आले आहेत. धोनीच्या नावावर २०४ आयपीएलचे सामने आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here