बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आयोगाने काही नियम बदलले होते. यामुळे मतमोजणीत उशीर झाला. पहाटे वाजेच्या सुमारास निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आले.
एनडीएने जिंकलेल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपने ७२ जागा तर जेडीयूला ४२ जागा जिंकता आल्या. व्हीआयपी आणि एचएएमचा प्रत्येकी ४ जागांवर विजय झाला. अशा मिळून एनडीएने १२२ जागा जिंकल्या. तर ३ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागांपैकी आरजेडीने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या. काँग्रेसने १९ आणि १६ जागा डाव्या पक्षांनी जिंकल्या. एमआयएमने ५ जागा जिंकल्या. तर बसपा, एलजेपी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी १ जागा जिंकली.
बिहार निवडणुकीत बेरोजगारी आणि सरकारी नोकऱ्यांचा मुद्दा गाजला. त्यासोबत करोना व्हायसर आणि स्थलांतरी कामगारांचा मुद्देही विरोधकांनी उपस्थित केले होते. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी बघायला मिळाली. पण त्यांचे मतात परिवर्तन होऊ शकले नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times