म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मागील फडणवीस सरकारच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर करण्यात आलेली माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यासह अन्य सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय सरकारने मंगळवारी घेतला आहे.

या महामंडळामार्फत सुरू असलेल्या योजना निरंतर सुरू राहतील. या योजनांतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या व्याज परताव्याचा लाभ यापुढेदेखील कायम देण्यात येईल, असे या महामंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. या महामंडळाने १९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत विविध व्यवसायांसाठी एक हजार २१५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या सर्व लाभार्थ्यांना महामंडळामार्फत ६१ कोटी रुपयांची व्याज परताव्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here