तिरुपतीः आंध्र प्रदेशातील तिरूमला देवस्थानम (टीटीडी) मध्ये आजपासून प्रत्येक भक्ताला मोफत एक लाडू मिळणार आहे. मंदिर प्रशासनाने याआधीच पवित्र भगवान वेंकटेश्वर मंदिरात मोफत प्रसाद देण्याची घोषणा केली होती. आंध्र प्रदेशातील तिरूपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. तिरूपतीचा बालाजी देशभरात प्रसिद्ध असून देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानापैकी एक तिरूपती मंदिर समजले जाते.

तिरूपतीमध्ये पोहोचलेल्या प्रत्येक भाविकाला एक देण्याची सुरूवात आजपासून सुरू झाली आहे. तिरूमाला मंदिरापासून याची सुरूवात झाली आहे. टीटीडीचे अतिरिक्त ईओ इवी धर्मा रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडिया शी बोलताना सांगितले की, आता कोणीही व्हीआयपी असो की गरीब भाविक सर्वांना एक लाडू मोफत दिला जाणार आहे. देवाच्या मंदिरात सर्व भाविक एकसमान असतात. दर्शन घेतल्यानंतर भाविकाला तिरूपती लाडू मोफत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत टीटीडी कडून दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना मोफत लाडू देण्यात येत होता. बाकी उर्वरित भाविकांना सबसिडी अंतर्गत लाडू देण्यात येत होता. यामुळे जवळपास लाडूचे धंदे बसवण्यात आले होते.

मंदिर प्रशासनाच्या या निर्णयानंतर या ठिकाणी पोहोचलेल्या सर्व भक्तांना एक लाडू मोफत देण्यात येणार आहे. मोफत लाडूवर खर्च करण्यात आल्यानंतरही मंदिर प्रशासनाला वर्षाकाठी २५० कोटींची रुपयांची बचत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here