आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेल दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत, त्यामुळे स्वस्त झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरातील कपातीची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत करोनाचा संसर्ग धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन फार्मा कंपनी फायजर विकसित करत असलेल्या करोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. फायजर विकसित करत असलेली लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.
फायजरने अमेरिका सरकारसोबत केलेल्या करारानुसार या वर्षाअखेर ४० दशलक्ष डोस आणि मार्च २०२१पर्यंत १०० दशलक्ष लस डोस पुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. फायजर अद्यापही लस चाचणीच्या महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहचले नाहीत. याआधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत लस चाचणीचा डेटा असू शकतो असे फायजरने म्हटले होते.
अमेरिकेतील तेलाच्या साठ्यात घसरण नोंदवण्यात आई. आली आहे. ६ नोव्हेंबर रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा साठा ५.१४७ दशलक्ष बॅरल इतका आहे. त्याआधीच्या आठवड्यात तेल साठा ८.०१ दशलक्ष बॅरल होता. तेल साठा कमी झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला असून तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times