बंदूकांसह एका गटाने गावावर हल्ला केला. यामध्ये स्थानिकांच्या घरांना आगी लावल्या. या जाळपोळीतून जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाचा:
मागील काही दिवसांपूर्वी काही गावांवर हल्ले करून दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. त्याशिवाय आणखी एका घटनेत जवळपास १२ पुरुषांच्या हत्या करण्यात आल्या. मुएडा जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जंगलात मृतदेह आढळल्यामुळे पोलिसांना या दहशतवादी कृत्याची माहिती समजली. जंगलात ५०० मीटरच्या परिघात जवळपास २० मृतदेह आढळले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाचा:
मार्च-एप्रिल महिन्यात हल्ले
या वर्षी मार्च महिन्यात आयएसच्या दहशतवाद्यांनी एका हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. हे हल्ले Exxon Mobil आणि Total गॅस प्रकल्पाजवळ करण्यात आले होते. या भागात जवळपास ६० अब्ज डॉलरचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र, मागील काही महिन्यात या भागात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. तर, एप्रिल महिन्यात ५० हून अधिकजणांचे मुंडके छाटण्यात आले.
वाचा:
मागील वर्षी आयएसच्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच केली होती. मोसिम्बाओ दा प्राइआ शहरावर हल्ला केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या नौदलाने त्यांच्या जोरदार प्रतिकार केला. मात्र, त्यांच्याजवळ असणारा दारूगोळा संपल्यानंतर नौदलाच्या जवानांनी पळ काढला. त्यामुळे या शहरावर आयएसचा ताबा झाला. या शहराजवळ अब्जावधी डॉलरच्या नैसर्गिक वायूचा एक प्रकल्प आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times