वाराणसीः दहशतवादी विरोधी पथकाने वाराणसीमधून आयएसआयच्या एका एजंटला अटक केली आहे. राशीद अहमद असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीचे फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानला पाठवत होता. यासाठी त्याला पैसे मिळत असायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीशिवाय त्याने अयोध्यामधील राम जन्मभूमी, काशी विश्वनाथ मंदिर, वायुसेना निवड बोर्ड, नागपूर रेल्वे स्टेशन, संकटमोजन मंदिर, लष्कर आणि सीआरपीएफ कॅम्पचे फोटो पाठवले होते. राशीद वर्षभर आयएसआयच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे.

एजंट राशीदचे कुटुंब वाराणसीत राहतात तर तो सध्या चंदौली जिल्ह्यातील पडाव मध्ये राहत होता. होर्डिंग आणि फ्लेक्सचे काम करणारा राशीद आयएसआयसोबत जोडला गेल्याची माहिती मिलिट्री इंटेलिजन्सला जुलै २०१९ मध्ये मिळाली होती. वाराणसीमधील एक तरूण व्हॉट्सअपवरून गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. १३ जानेवारी २०२० ला पाकिस्तानी एजंट सोबत राशीदची चर्चा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एटीएसने १६ जानेवारी रोजी त्याला ताब्यात घेतले. लखनऊला घेऊन गेल्यानंतर आयबी आणि मिलिट्री इंटेलिजन्स च्या पथकांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली.

राशीद २०१७ आणि २०१८ मध्ये कराची मध्ये राहणाऱ्या आपल्या मावशीकडे राशीद गेला होता. कराचीत काही दिवस राहिल्यानंतर त्याची भेट आयएसआयच्या दोन एजंटसोबत झाली. गुप्त माहिती पाठवल्यास त्याला महागडे गिफ्ट आणि पैसे मिळत असत. भारतात परतल्यानंतर राशीदने फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले. जुलै २०१९ मध्ये राशीदला पाच हजार रुपये आणि महागडे गिफ्ट पाकिस्तानातून मिळाले होते. १३ जानेवारी रोजी त्याचा अखेरचा संपर्क झाला होता. जोधपूर मिलिट्री कॅम्पमधील गुप्त माहिती दिल्यास त्याला १ लाख रुपये आणि दर महिन्याल १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन पाकिस्तानमधून देण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या राशीदने व्हॉट्सअपवरून अनेक संवेदनशील स्थानांची माहिती, फोटो व व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले होते, असे एटीएसने सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here