एटीएम फोडण्यासाठी चोरटे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पांढऱ्या रंगाची कार घेऊन आले होते. चोरट्यांनी हे एटीएम फाउंडेशनमधून तोडले. मशीन फोडून त्यामधील पैसे काढता न आल्याने चोरट्याने मशीनच चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोखंडी साखळीने एटीएम मशीन हे आपल्या कारला बांधले. कारचा वेग वाढवून ते मशीन सेंटरमधून ओढून काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी एटीएम सेंटरच्या काचा फुटून मशीन बाहेर येत असताना मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागिरकांना जाग आली. नागरिकांच्या भीतीने चोरट्यांनी मशीन जागीच टाकून तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरसे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times