अनिकेत कैलाश मेश्राम (वय २३, रा. ओंकारनगर, रामेश्वरी) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. विनीत व आकाश मिहानमधील कंटेनर डेपोत काम करायचे. शनिवारी विनीतने मित्रांना बिर्याणी व चिकन तंदुरीची पार्टी दिली. या पार्टीत आकाशला बोलाविले नाही. त्याला साधी विचारणाही केली नाही. पार्टीला न बोलाविल्याने आकाशने विनीतसोबत वाद घातला होता. रविवारी दोघेही काम आटोपून घरी जायला निघाले. दोघांनी दारू विकत घेतली. ते वेळा हरिश्चंद्र भागात गेले. तेथे दारू प्यायली. पार्टीवरून आकाशने विनीतसोबत वाद घातला.
विनीतने आकाश याला ठार मारण्याची धमकी दिली. आकाशने जवळीच दगडाने डोके ठेचून विनीतची हत्या केली व पसार झाला. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आकाशला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times