सीवान, बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झालेत. हे निकाल हाती आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या झाल्याची माहिती मिळतेय. या हाणामारीत जवळपास सहा – सात गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. या घटनेनंतर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलीय.

सिवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडलीय. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेशकांत सिंह यांनी विजय मिळवलाय. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि आरजेडी कार्यकर्त्यांची काही कारणावरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं.

अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबांनी आपल्या घरांवर आरजेडीचा झेंडा लावला होता. यावरून गावातील भाजप समर्थक नाराज होते. निकाल हाती येताच भाजपच्या समर्थकांचा जोर वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली.

वाचा : वाचा :

या हाणामारीत राजदचे कार्यकर्ते गंभीर स्वरुपात जखमी झालेत. त्यांच्यावर सीवानच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींच्या म्हणण्यानुसार, घरावर आरजेडीचा झेंडा लावण्यावरून गावात भाजप समर्थक नित्यानंद सिंह यांच्यासहीत १४ जणांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.

वाचा : वाचा : बिहार विधानसभेचा निकाल बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या निकालात राष्ट्रीय जनता दलानं (RJD) ७५ जागांवर विजय मिळवलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपनं ७४ जागा आपल्या ताब्यात घेतल्यात. तर जेडीयूला ४३, काँग्रेसला १९, एलजेपी १ आणि इतरांना ३१ जागा मिळाल्यात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here