मुंबईः बिहारमधील विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा एनडीएनं मुसंडी मारली आहे. एनडीएनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काय राखली आहे. त्याचवेळी बिहारमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला फारसे यश मिळवता आले नाहीये. यावरूनच भाजपनं शिवसेनेला पुन्हा एकदा घेरलं आहे.

भाजपचे नेते यांनी शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन, असा खोचक टोला लगावला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला २२ जागांवर नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. याच मुद्द्यावरून निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. शिवाय शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूरही पोस्ट केला आहे.


वाचाः

निलेश राणी यांनी आणखी एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत विरोधकांना भीती नाही. कारण या निवडणुकीत शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात संजय राऊत करतील अशी आम्हाला खात्री आहे,’ असं राणे यांनी म्हटलं आहे.

वाचाः

दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज पहाटे ३ वाजता लागला. विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीएने (भाजप-जेडीयू) या निवडणुकीत १२२ जागांचा बहुमताचा जादूई आकडा पार केला असून ३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडीला (आरजेडी – काँग्रेस ) निवडणुकीत ११० जागा जिंकता आल्या. यामुळे बिहारमधील सत्तांतराचं काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचं स्वप्न भंगलं आहे. पण भाजपच्या तोडीसतोड जागा मिळवत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना सत्ता मिळाली नसली तरी त्यांचा हा विजयच मानला जातोय.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here