बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न होणार का, असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिहार आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री जेडीयूचा होणार आणि ते असतील हे आधीच ठरलंय. पंतप्रधान मोदी यांनीच तशी घोषणा केली आहे. भाजप शब्दांचा पक्का आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संमतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली होती. आम्ही त्यावर अडून राहिलो. इथे मोदींनी जेडीयूचा मुख्यमंत्री होईल असा निर्णय घेतला आहे आणि तो आम्हाला मान्यही आहे. मोदी आमचे सर्वोच्च नेते आहेत. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करु,’ असंही ते म्हणाले आहे.
वाचाः
बिहारमध्ये निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना करण्यात आली होती. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला बिहारच्या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं. पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदार मिळाली होती. अगदी सुरुवातीपासून ते तिकीट वाटपापर्यंत, प्रचारापर्यंत सहभागी होता. प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचा वेगळा अनुभव असतो. बिहारमध्ये राजकीय प्रगल्भता प्रचंड आहे. सामान्य मतदार जागरुक आहे. एक वेगळ्या प्रकाराचं राजकारण पाहायला मिळतं,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times