वाचा:
पाटील म्हणाले, ‘बिहार विधानसभा निवडणूक, तसेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगण आदी राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं व जनतेचं अभिनंदन केलं आहे. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली हे यश मिळालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बूथ पातळीपासून पक्षाच्या बळकटीसाठी देशभर राबवलेल्या व्यापक मोहिमेचा लाभ पक्षाला होत आहे,’ असं ते म्हणाले.
वाचा:
‘बिहारच्या जबरदस्त यशाबद्दल मी पक्षाचे निवडणूक प्रभारी फडणवीस यांचं विशेष अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये भाजपनं जिंकलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस वाढ झाली आहे. प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्या असताना, भाजपचं यश अधिक उठून दिसतं,’ असं ते म्हणाले.
ते पुढं म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’, या सूत्रानुसार सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचा आहे. त्यांच्या या विकासाच्या राजकारणाचं बिहारसोबतच देशभरातील ठिकठिकाणच्या जनतेनं समर्थन केलं आहे. करोनाच्या संकटात अनेक विकसित व श्रीमंत देश हतबल झाले असताना भारतानं मोदींच्या नेतृत्वाखाली या महासाथीचा प्रभावी मुकाबला केला. केंद्र सरकारनं गोरगरीबांना व स्थलांतरित कामगारांना मदत पोहोचवली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देशभर प्रभावी सेवाकार्य केलं. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केलं. या सर्वामुळं जनतेनं भाजपला पसंती दिली.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times