आज नगर मधील जलसंपदा विभागात मंत्री बच्चू कडू आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे ही उद्घाटन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बिहार येथील निकालाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, राजकारणात कमी-जास्त चालू असते. राजकारणात कधी हवा असते, तर कधी मंदी असते. तसंही बिहारमध्ये पाहिजे एवढा मोठा विजय भाजपच्या हाती लागला नाही,’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
वाचाः
दरम्यान, बिहार व मध्य प्रदेश येथील सरकार स्थिर झाल्यानंतर भाजप राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करू शकते का ? असे कडू यांना विचारले असता ते म्हणाले, ‘बिहार येथील निकालाचा महाराष्ट्र राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट या निकालाचा परिणाम हा केंद्रातील सरकारवर होईल, असंही ते म्हणाले आहेत.
पाहाः
वाचा:
कृषी विधेयकाविषयी आपली भूमिका मांडताना बच्चू कडू म्हणाले, ‘कृषी विधेयकातील दोन ओळी बदलाव्यात. ५० टक्के नफा धरून शेतीमालाचे हमीभाव काढले पाहिजेत, व त्याच भावात तो शेतीमाल खरेदी करण्याची सरकारने हमी घेतली पाहिजे. एवढा बदल केला तर मी भाजपात जाईल व त्यांची सेवा करेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times