आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील ऊसतोड कामगारांना कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबतची माहिती देताना पवार यांनी ऊसतोड कामगारांच्याा मुलांची होत असलेली परवड मांडली होती. तसे ट्विट त्यांनी केले आहे.
वाचा:
‘माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेजी या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे,’ असे ट्विट पवार यांनी केले. या ट्विटला मुंडे यांनी तातडीने कमेंटसह रिट्विट केले असून ऊसतोड कामगारांची मुली लवकरच फडा ऐवजी चांगल्या शाळेत दिसतील, असे स्पष्ट केले आहे.
वाचा:
‘रोहित पवारजी, आपण ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने स्व.गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करत आहोत. ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील!’ असे मुंडे यांनी म्हंटले आहे. त्यावर पवार यांनी मुंडे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times