मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील नेरूळमध्ये हुक्का पार्टी सुरू होती. पोलिसांनी छापेमारी करून जवळपास दोनशेहून अधिक जणांविरोधात कारवाई केली. कोविड १९ संबंधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांखाली या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे आयोजन बेकायदा करण्यात आले होते. एका ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. कोविड १९ नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
नेरूळमधील एका पबमध्ये ही पार्टी सुरू होती. पथकाने छापेमारी करून बेकायदा सुरू असलेली ही पार्टी उधळून लावली. या पबमध्ये २०३ लोक हुक्का ओढत होते. तसेच काही जण मद्यपानही करत होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र या पार्टीत पाहायला मिळाले. या प्रकरणी पब मालकासह २७ कर्मचाऱ्यांविरोधातही विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही या पबवर कारवाई करण्यात येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक आणि काही सेवा सुरू करण्यात आल्या असल्या तरी, अद्याप पब खुले करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होईल, असे सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times