नवी दिल्ली: शिवसेनेने २०१४ मध्ये काँग्रेससोबत आघाडी करणार होती हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून यानिमित्ताने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी तोफ विरोधी पक्षनेते यांनी डागली.

पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ व जबाबदार नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आहेच पण शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणारंही आहे. हे विधान गांभीर्याने घ्यावं लागेल. यातून शिवसेनेसाठी विचारधारा नव्हे तर केवळ सत्ताच सर्वतोपरी असल्याचे स्पष्ट होते. यावर शिवसेनेला उत्तर द्यावे लागेल, असे आव्हानच फडणवीस यांनी शिवसेनेला दिले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. २०१४ पासून काँग्रेस-शिवसेना आघाडीचे प्रयत्न सुरू होते हा खुलासा धक्कादायक आहे. शिवसेनेचा सत्तामोही चेहरा यामुळे समोर आला आहे. दिवसा आमची सोबत आणि रात्री काँग्रेसशी चर्चा हे शिवसेनेचे वागणे क्लेशदायक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा खरा आहे, असे म्हणत त्यास दुजोरा दिला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार

२०१४ मध्ये तसा काही प्रस्ताव दिल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण तशा प्रस्तावाबाबत बोलत असतील, तर त्यांनी हा प्रस्ताव देताना उपस्थित असणाऱ्यांची नावे उघड करावीत, असे आवाहन करतानाच, पृथ्वीराज चव्हाण हेच याबाबत अधिक माहिती देऊ शकतात, असे परब यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनेही इन्कार केला. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक म्हणाले.

पृथ्वीराज काय म्हणाले?

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचं अल्पमतातलं सरकार विराजमान झालं होतं. तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भाजपला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला होता. जय-पराजय होतच असतात. काँग्रेसच्या पदरी पराभव आला असला तरी या पराभवाने काही डोंगर कोसळलेला नाही. याआधीही असे पराभव झालेत व विरोधी पक्षात आम्ही बसलोत, असे परखड मत नोंदवत तेव्हा मी आघाडीचा प्रस्ताव फेटाळला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here