भारतीय संघ युएईवरून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. रोहितदेखील या संघाचा एक भाग आहे. पण रोहित भारतीय संघाबरोबर न जाता भारतामध्ये येणार आहे. भारतामध्ये रोहित मुंबईत दाखल होणार आहे. आपल्या कुटुंबियांसमवेत रोहित यावेळी दिवाळी साजरी करणार असल्याचेही समजत आहे. त्यानंतर रोहित हा बंगळुरुला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाणार आहे. तिथे गेल्यावर रोहितला तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागणार आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे.
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी निवड तेव्हाच होऊ शकते, जेव्हा संघाचे फिजिओ रोहित शर्मा फिट असल्याचे जाहीर करतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहितला भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांच्यापुढे फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. या चाचणीमध्ये रोहित फिट असल्याचे जर फिजिओ पटेल यांना वाटले तरच तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला जाऊ शकतो. या चाचणीत जर रोहित शर्मा नापास ठरला तर त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार नाही.
यापूर्वी फिजिओ पटेल यांनीच रोहित फिट नसल्याचे बीसीसीआयला सांगितले होते. त्यामुळेच रोहितला संघा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकिकडे रोहित हा भारतीय संघाच्या फिजिओंना फिट वाटत नाही, पण दुसरीकडे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या फिजिओंना रोहित फिट वाटतो आणि तो सामना खेळायलाही उतरतो, याबाबत चाहते संभ्रमात आहेत. त्यामुएळ रोहितला बंगळुरुला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन तंदुरुस्ती चाचणी देणे भाग असले. या चाचणीच्या निकालावरच रोहित हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकणार की नाही, हे सर्वांना समजता येऊ शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times